
नाशिक ( प्रतिनिधी)के.के.वाघ कृषी महाविद्यालयातील कृषीदूत विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रम या अभियानाच्या माध्यमातून चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव या गावातील शेतकऱ्यांसमवेत जागतिक माती दिन साजरा केला. कृषिदूत विद्यार्थ्यांनी या गावातील शेतकऱ्यांना मातीचे महत्त्व, मातीची पोत, माती परीक्षण, माती विश्लेषण, माती संवर्धन आणि व्यवस्थापन याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. या अभियानात कृषी महाविद्यालयाचे कृषिदूत विद्यार्थी अथर्व चकोर ,ओम आव्हाड ,ऋषिकेश बडगुजर, प्रथमेश भालेराव , यश भोर, पियुष भालेराव, रोहित बोडके तसेच गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री.रावसाहेब भालेराव, ग्रामसेवक योगेश माळी आदी ग्रामस्थ व शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले होते.
सदर अभियानाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा. के.एस बंदी, कॅम्पस समन्वयक डॉ.की.एम सेवलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम हाडोळे , प्रा.तुषार उगले, प्रा.परमेश्वरी पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
