
सिन्नर (प्रतिनिधी)२६ जानेवारी २०२६ राॅबिनहुड तंट्यामामा भिल्ल यांच्या १८४ व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन! करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात रॉबिनहुड तंट्यामामा भिल्ल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले
७६ वा प्रजासत्ताक दिनाच्या महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सर्व भारतीयांना मनपूर्वक सदिच्छा
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिना विषय आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि २६ जानेवारी १९५० साली भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र बनला. या दिवशी भारताची राज्यघटना (संविधान) लागू झाली, ज्यामुळे देशात लोकशाही तत्त्वांची स्थापना झाली आणि सर्व नागरिकांना समान अधिकार मिळाले.देशभरात उत्सव: देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते आणि देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच तंट्यामामानी १८७८-१८८९ या कालखंडात मध्यप्रदेशच्या सातपुडा भागामध्ये टोळी उभारून सावकार जमीनदार, इंग्रज, पैसेवाले यांच्या विरोधात बंड पुकारले लोक सावकार,जमीनदार,इंग्रज यांच्या जुल्मी अन्याय,अत्याचाराला कंटाळले होते .त्याचा बिमोड करण्यासाठी तंट्यामामानी अनेक साथीदार गोळा केले.तरूण जवानांची फलटण तयार केली.इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.तंट्यामामानी सावकार जमिनदार, पैसेवाल्यांना लुटून गोरगरीबांना मदत केली.

विजय मुठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राॅबिनहुड तंट्याभील हे शुर,धाडसीपणामुळे लोक त्यांना राँबिनहुड म्हणू लागले.तसेच त्यांनी अनेक गोरगरीबांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी पैसे देत होते त्यामुळे लोक त्यांना “तंट्यामामा” म्हणत.एकदा इंग्रजांसोबत झालेल्या चकमकीत तंट्यामामाला गोळी लागली ते जख्मी झाले.त्यांना पकडले गेले व जबलपुरच्या कोर्टात त्यांच्यावर खटला चालला.त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून ४ डिसेंबर १८८९ ला फाशी देण्यात आले.तंट्यामांमाचं स्मारक असलेल्या पाताळपाणी येथे आजही त्यांना अभिवादन करण्यासाठी रेल्वे थांबते यावरून त्यांचं कार्य किती महान होतं हे यातून दिसून येतं.तंट्यामामानी आदिवासींना आपल्या अस्मीतेसाठी, हक्क,अधिकारासाठी,अस्तीत्वासाठी संघर्ष करण्यास शिकविले अशा महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिशा वायचळे हिने केले व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले तर आभार अंकिता मुठे हिने मानले
यावेळी मातृशक्ती मनिषा डगळे, अभिशा वायचळे, अंकिता मुठे, मानशी डगळे, महामित्र दत्ता वायचळे,
राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, हरीभाऊ वरंदळ बाळासाहेब मुठे जगन्नाथ डगळे श्रीकांत आंबेकर किरण मुठे रोहित मुठे प्रकाश गुंजाळ सागर पारे,विलास बिन्नर शंकर बिन्नर सोहम डगळे आदी उपस्थित होते.
