
जनता इंग्लिश स्कूल सायखेडामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर
नाशिक ( प्रतिनिधी ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सायखेडा येथील जनता विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख, शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजयजी कारे सायखेडा गावच्या सरपंच श्रीमती सुवर्णा शिंदे
तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री माणिकराव वनारसे , श्री जगन आप्पा कुटे , श्रीमती निर्मलाताई खर्डे, श्री महेश कुटे, श्री राजेंद्र कुटे, श्री अविनाश सुकेणकर , श्री नितिन गावले, श्री मनोज भुतडा, श्री दिलिप शिंदे, श्री अनिल कातकाडे,श्री भाऊसाहेब कातकाडे, श्री प्रविण कुटे, जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री रामदास वाजे,उपमुख्याध्यापिका श्रीमती अलका अहिरे,पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार अभिनव बालविकास मंदिर च्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम ज्यू.कॉलेज विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समिती अध्यक्ष श्री.विजय कारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट/गाईड ध्वजाचे ध्वजारोहण सायखेडा गावच्या सरपंच श्रीमती.सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.संगीत शिक्षक ज्ञानेश्वर कर्पे व त्यांच्या गीतमंचाने राष्ट्रगीत,राज्य गीत व ध्वजगीत सादर केले.कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे देखील वाचन करण्यात आले. शालेय पंतप्रधान कु. संस्कृती जाधव हिने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. तसेच असाक्षरमुक्त गाव शपथ श्री पंकज गांगुर्डे यांनी दिली.

प्रजासत्ताक कार्यक्रमात N.C.C च्या विद्यार्थ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला व संचलन केले.या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील एनसीसी ऑफिसर श्री एस. एस. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी देखील आजच्या या सोहळ्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.स्काऊट गाईड विद्यार्थी देखील कार्यक्रमात सक्रिय होते सदर विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड समिती प्रमुख पंकज गांगुर्डे व श्रीमती मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालय परिवारातर्फे स्वागत करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना श्री गडाखसाहेब म्हणाले 26 जानेवारी रोजी आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला.उपस्थित सर्व आजी-माजी विद्यार्थी सर्व पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शासन आदेशानुसार संगितमय कवायत क्रीडाशिक्षक श्री गिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोळीनृत्य, वासुदेव, विविध देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कर्पे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्रीमती शिंदे मॅडम, श्रीमती अर्चना आरोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे सुंदर असे फलक लेखन विद्यालयातील कलाशिक्षक श्री महाले सर व श्रीमती कापडी मॅडम यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री माणिक गिते तसेच विद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांनी सदर कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.सूत्रसंचालन श्री अवधूत आवारे यांनी केले. आभार श्री. अशोक टर्ले यांनी मानले.
