
लोहोणेर येथील जनता विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करताना माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, उपस्थित मान्यवरांसह मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे व पर्यवेक्षक विलास निकम.(छाया-:सुनील एखंडे)
लोहोणेर-( प्रतिनिधी):येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच रेशमा रमेश अहिरे,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष दीपक देशमुख,माता-पालक संघ उपाध्यक्ष सविता देशमुख यांच्यासह शालेय समिती, व्यवस्थापन समिती,पालक-शिक्षक संघ व माता-पालक संघाचे सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे, पर्यवेक्षक विलास निकम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या गीत मंचाने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.त्यानंतर प्रास्ताविकात मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगत २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू होऊन भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्याची माहिती दिली. संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्काऊट- गाईड ध्वजाचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे यांच्या हस्ते झाले. यानंतर स्काऊट-गाईड पथकाने शिस्तबद्ध संचलन सादर केले.यावेळी दशरथ शेवाळे यांच्याकडून मुलगी कै. मयुरी दशरथ शेवाळे हिच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक वनीकरण परिक्षेत्र देवळा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तर रामदास शंकर बागुल व समाधान मोठाभाऊ बागुल यांनी आई कै.सखुबाई शंकर बागुल यांच्या स्मरणार्थ विद्यालयास ११,१०० रुपयांची देणगी नाना जाधव यांच्या हस्ते सुपूर्द केली.कार्यक्रमाच्या शेवटी कॉपीमुक्त परीक्षा अभियान अंतर्गत सर्व उपस्थितांनी कॉपीमुक्त परीक्षेची शपथ घेतली. त्याचबरोबर असाक्षर मुक्त गाव ही शपथही यावेळी घेण्यात आली.
कार्यक्रमासाठी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंदांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक विलास निकम यांनी मानले.
