
वसंतनगर (ता. नांदगाव) : श्री साई ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय, वसंतनगर ता. नांदगाव जि. नाशिक येथे भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. एस. जी. राठोड साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. सिद्धांत दादा राठोड, श्री. एन. के. राठोड साहेब तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायतीचे शिस्तबद्ध सादरीकरण, देशभक्तीपर गीत गायन, लेझीम पथकाचे सादरीकरण व प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.

या शैक्षणिक वर्षात विविध शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला. तसेच शासन परिपत्रकानुसार असाक्षर मुक्त गाव व इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉफी (कॉपी) मुक्त परीक्षा अभियान याबाबत विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक शपथ घेतली.
कार्यक्रमास विद्यालयाचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक,प्राचार्य प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत केले.
अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला
