
कुंदेवाडी ( प्रतिनिधी); दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ठीक साडेसात वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व मान्यवर उपस्थित होते.श्री.स्वप्नील कुंटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.अध्यक्ष निवड करुन श्रीमती शैला चांडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जि.प.शाळा कुंदेवाडी शाळेतील मुख्याध्यापक सौ.वैशाली शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. यानंतर दौलतराव नागरी पतसंस्था आणि त्र्यंबकराव भालेराव सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात श्री. संतोष भालेराव वाचनालय उपाध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ वैशाली शिंदे यांनी “जग ना करी ज्यांची गणती” हे अनाम वीरांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे पुस्तक ग्रंथालयासाठी सस्नेह भेट दिले.

यानंतर जिल्हा परिषद शाळा कुंदेवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.श्री.मंगेशभाऊ भुजबळ यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक कोनशिलेचे पुजन करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मा.श्री.विलास काळे यांच्या हस्ते ध्वजपुजन व ध्वजारोहण करण्यात आले.गावातील प्रतिष्ठीत नागरिक मनिष किराणा दुकानाचे संचालक मा.श्री.हर्षल जैन यांनी शाळेला रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यासाठी पाच हजार रुपये रोख रक्कम दिली .तसेच

शिक्षणप्रेमी,मा.श्री.वैकुंठ भाऊ पाटील ,शिक्षणतज्ञ श्री.अभय बलदोटा, श्री.तुपे सर,श्री.शंकर साठे, श्री.राजू भालेराव, श्री.राजेंद्र शिंदे,श्री.संदीप शिंदे, श्री.सोमनाथ ताडगे, श्री.सचिन ढमे, श्री.नंदू वाकडे,श्री.बापू गायकवाड, श्री.कृष्णाजी गायकवाड, श्री.भाऊसाहेब वाकडे,
श्री.संतोष भाऊ भालेराव, यांनी शाळेला लोकसहभागातून मदत करण्यासाठी सुरूवात केली आहे.त्यांच्या भरीव योगदानाबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले.
माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.विनोद ढमे,श्री.बाळासाहेब ताडगे,
श्री.सुनिल घेगडे
श्री.दिलीप कोकाटे,
ग्रामसेवक श्री.स्वप्नील कुंदे ,सौ.कविता बलदोटा,सौ.तृप्ती जाधव,पुजा मोरे,भाग्यश्री वावधाने,निलम सोनवणे,शेहनाज मनियार ,सविता गवळी, योगिता शिंदे,सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.श्रीमती लायरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त थोर क्रांतीकारक व संविधान आधारित भाषणे केली. सर्व उपस्थितांनी असाक्षर मुक्त अभियानाची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन, नाटिका सादर केली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती लायरे मॅडम,श्रीमती महाजन मॅडम यांनी संगीतबद्ध कवायत संचलनाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिस्त,एकता, बंधुता,समानता,राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम या मूल्यांची रुजवण होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेत हसत खेळत व कृतीतून शिक्षण देण्यासाठी शाळा विविध उपक्रम राबवत असते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.मंगेश भुजबळ, उपाध्यक्ष मा.श्री विलास काळे व इतर सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे मॅडम,श्रीमती लायरे मॅडम,श्रीमती पाटील मॅडम,श्रीमती महाजन मॅडम,पोषण आहार कार्यकर्ते सौ.सरला पवार व सौ.अनिता पवार,गणेश बिडवे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी आभार मानले.मिठाईवाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे समस्त ग्रामस्थ,माता पालक यांनी विशेष कौतुक केले.
