
सिन्नर (प्रतिनिधी,वसंत गोसावी) :कोनांबे (ता. सिन्नर) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे ज्येष्ठ सभासद प्रकाश भागवत यांच्या हस्ते ध्वजपूजन तर नवनिर्वाचित उपसरपंच परशराम डावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामस्थांना
असाक्षर मुक्त गाव तसेच कॉपी मुक्त अभयान परीक्षेची शपथ देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवदास डावरे, सरपंच विष्णु गवारी, भास्कर डावरे, प्रकाश डावरे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी डावरे, अंबादास डावरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष डावरे, उपाध्यक्ष धनंजय डावरे, खजिनदार वैभव डावरे, अविनाश डावरे, दामू डावरे, अमोल गवारी आदी मान्यवर तसेच शाळेचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती शिंदे यांनी प्रास्ताविक केले. हेमंत टिळे यांनी सुत्रसंचलन केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी धनश्री जाधव, जयश्री गोहाड, हर्षदा डावरे, वैशाली काकड, शिपाई धीरज भागवत आदींनी परिश्रम घेतले.
