
मोरेवाडी ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे भारताचा “७७”वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात येऊन शाळेचे ध्वजारोहण श्रीयुत बाळू लहू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय झेंड्यास सलामी देऊन राष्ट्रगीत,ध्वजगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.

केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता उपक्रमांतर्गत असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्यात आली.”सारे जहाँ से अच्छा”या देशभक्ती गीतावर विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत संचालन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित मान्यवर पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून बक्षीस दिले,

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयुत बाळू लहू मोरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वही,पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.श्रीयुत काभू मोरे यांच्यातर्फे सोनपापडी व चॉकलेट या मिठाईचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले,तर ग्रामपंचायत कासारी,तसेच श्रीयुत ज्ञानेश्वर मोरे यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य,मोरेवाडी वस्तीचे ग्रामस्थ,पालक,अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस,शाळेचे स्वयंपाकी,शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
