
परधाडी ( प्रतिनिधी ) आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय परधाडी या विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला विद्यालयाचे ध्वजारोहण गावातील ज्येष्ठ नागरिक श्री अर्जुन गायकवाड (गुरुजी) यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी कैलासवासी शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ नायडोंगरी या संस्थेचे संचालक मान.श्री. तेजराज (भैय्यासाहेब) विजय आहेर उपस्थित होते
तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व पालक व माजी विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती दर्शवली. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिक संगीतमय कवायत केली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन डी गरुड सर श्री भोसले सर श्री बोरसे सर श्री पवार सर श्री आहेर भाऊसाहेब व श्री निलेश पवार उपस्थित होते
कार्यक्रम अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.
