
नांदगाव-( प्रतिनिधी ) ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम सरताळे येथे संस्था कोषाध्यक्षा तथा प्राथमिक आश्रमशाळा मुख्याध्यापिका श्रीमती नम्रता शेवाळे यांच्या हस्ते ध्वज पुजन व ध्वज फडकवून भारतीय गणतंत्र्याचा 77 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी आश्रम शाळा विद्यार्थांनी व शिक्षण शास्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भाषणे,देशभक्तीपर गीतगायन, नृत्य व आश्रमशाळा विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायत सादरीकरण झाले.

नंतर आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी, शिक्षण शास्र महाविद्यालय प्राचार्य घुगे सर यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून दिली. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे आणि जेवढा सक्षम तेवढा आपला देश भक्कम असेल याची जाणीव करून दिली.कार्यक्रम अध्यक्ष संस्था कोषाध्यक्षा नम्रता शेवाळे मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणुन शिक्षण शास्र महाविद्यालय प्राचार्य घुगे सर, श्री गजानन महाराज महिला विद्यालय प्राचार्य सुरसे सर आश्रम शाळा प्राचार्य चौधरी सर उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक एम. ओ. पाटील यांनी केले तर सुत्र संचालण डी. पी. सुर्यवंशी यांनी सांभाळेल कवायत व कमांड्स बी. एस. हिरे सर यांनी दिल्यात.

कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिक्षक, अधिक्षिका मॅडम यांनी विशेष प्रयत्न केलीत.
