
लासलगाव, दिनांक 26 (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७६वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भारतीय नौदल सेनेचे सेवानिवृत्त कॅप्टन नीळकंठ खोंड यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीताचे गायन झाले. ध्वजवंदनानंतर लेफ्ट. प्रा.बापू शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करत ध्वजाला व प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एन.सी.सी. च्या छात्रांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्ट. प्रा.बापू शेळके यांनी केले.

कोणीही मोठा अथवा छोटा नाही, तर जो देशाच्या नियमांचे पालन करतो तोच व्यक्ती मोठा ठरतो. आपण केवळ भाषणे न ऐकता संविधानाचा आदर करूया असे प्रतिपादन कॅप्टन खोंड यांनी या वेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर होते. यावेळी मंचावर श्री.प्रकाश जगताप, श्री.चंद्रशेखर भावसार, श्री.हसमुखभाई पटेल, श्री.भाऊसाहेब रायते, ॲड. संदीप होळकर, श्री.सचिन मालपाणी, श्री.संजय पाटील, श्री.मयूर होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या शितल आचार्य, पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, कार्यालय अधिक्षक श्री.रविंद्र होळकर इ. उपस्थित होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, झांज व लेझीम पथक, लाठी-काठी, मनोरा व देशभक्तीपर नृत्य यामुळे या वर्षीचा प्रजासत्ताक दिन आगळा-वेगळा ठरला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पार पडले. त्यानंतर प्रतिमा भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. अशाप्रकारे विविध उपक्रमांसह प्रजासत्ताक दिन अतिशय आनंद, उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
