
ओझर: दि. 26 (वार्ताहर) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण ‘मविप्र’ महिला संचालिका शोभाताई बोरस्ते यांचेहस्ते, तर स्काऊटचे ध्वजारोहण सेवक संचालक डॉ एस के शिंदे यांचे हस्ते झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. मविप्र सेवक संचालक डॉ एस के शिंदे म्हणाले, भारत जगातील एकमेव बलाढ्य लोकशाही देश असून गौरवशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी देशासाठी संघटित होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या अथक प्रयत्नातून स्थापन झालेल्या एनसीसी पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. पथकास शिक्षक नरेंद्र डेरले शितल हंडोरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात शोभा बोरस्ते यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.

विद्यालयाच्या गीतमंचाने महाराष्ट्रगीत राष्ट्रगीत ध्वजगीत सादर करून देशभक्तीपर गीते गायली. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष भास्करराव शिंदे सदस्य निवृत्ती शेटे खंडेराव मालसाणे वसंत गवळी जंगल पगार पुंडलिक गवळी लक्ष्मण चौधरी समीर मोरे आदी सदस्य अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते.फलक रेखाटन कला शिक्षिका सविता पवार मोनाली निकम यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका मोनाली निकम, मोहिनी चौधरी यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक सतीश केदार यांनी मानले.
