
साकोरे (प्रतिनिधी ) ७७ वा प्रजासत्ताक दिन पेङकाई माता संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे आंनदात पार पङला संस्थेचे माजी सचिव सेवानिवृत्त शिक्षक विलास बापू बोरसे यांच्या हस्ते पार पङला तसेच ध्वज पूजन स्कूल कमेटी चेअरमन रमेश आण्णा बोरसे यांच्या हस्ते झाले यावेळी नांदगाव कृषीउत्पन्न बाजार समिती चे माजी चेअरमन सतिष बोरसे, माजी सरपंच शरद बोरसे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बोरसे, अर्जुन सुलाणे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पिरनाईक, भास्कर सुरसे, गोरख सांवत, एस एल बोरसे, प्रल्हाद निकम, माजी विद्यार्थी संघटनेचे योगेश निकम, वसंत कदम, प्राथमिक आरोग्य अधिकारी कर्मचारी, आशा सेविका, माता पालक समिती सदस्य, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूञसंचलन क्षीरसागर सर यांनी केले व संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच संगित कवायत साठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर वृंद यांनी परिश्रम घेतले आभार मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी मानले
