
मालेगाव दि 25 जाने 2026
सरोज क्लासेस हे मालेगाव मधील विश्वासार्ह शैक्षणिक संस्थान असून गेल्या 30 वर्षांपासून मालेगाव मधून अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आणि वैज्ञानिक घडविण्यात त्यांचा सिम्हाचा वाटा आहे. शिकवणी वर्गानी त्यांचा आदर्श घेऊन इंटरटेनमेंट वर नव्हे तर एजुकेशन वर भर द्यायला हवा असे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांकरिया यांनी केले.

मालेगाव परिसरातील अग्रगण्य शिकवणी वर्ग सरोज क्लासेस च्या 30 व्या वर्षपूर्ती निमित्याने आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र्रातील अनेक ख्यातनाम डॉक्टर इंजिनियर व परदेशातील राजदूत असलेले अनेक विद्यार्थी सरोज क्लासेस ची यशोपताका अभिमानाने मिरवीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढले.
या प्रसंगी क्लासेस मधील अत्याधुनिक व अद्ययावत लायब्ररी विभागाचे उदघाटन डॉ राधिका जोशी यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी आयोजित विज्ञान प्रदर्शनात ह्यूमन स्केलेटन या विषयावर क्लासेस चे विद्यार्थी मोहिनी भागवत, सिद्धी सूर्यवंशी, धीरज जाधव, पार्थ कचवे, साहिल चव्हाण, अनुराग पाडवी, प्रेम खरे, रुद्र कार्डीवाल, अनुज नरोटे, वेदांत पगार, योगेश्वरी शेलार, सिद्धी सोमवंशी, अनुजा बागुल,वैष्णवी महाले, भूषण कापडणीस, सार्थक हिरे ललित चव्हाण यांनी विविध मॉडेल्स, चार्ट्स
यांचा वापर करून परिमाणकारक सादरीकरण केले.

या वेळी बोलतांना संचालिका प्रा अनघा आनंद जोशी यांनी विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक आस्था व त्यांच्या चिकाटीचे कौतुक करून पुढील अभ्यासात यशस्वी होण्यासाठी वर्षभर कष्ट करण्याचे आवाहन केले. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी प्रा डॉ गोकुळ सूर्यवंशी यांनी परीक्षण केले.
या प्रसंगी प्रा डॉ आनंद जोशी, प्रा प्रकाश सोमवंशी, प्रा सचिन काळे यांचे सह अनेक प्रतिष्ठित पालक व नागरिकांनी विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन समाधान व्यक्त केले. या प्रसंगी विद्यार्थी पार्थ कचवे याने सूत्र संचलन केले तर आभार प्रदर्शन सरोज क्लासेस च्या संचालिका प्रा अनघा जोशी यांनी केले.
