
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६२ वा दिवस
हिंदुस्तानचे पुनरुत्थान होणारच. ते विजयपदी विराजमान होणारच. पण तलवारीच्या जोरावर नव्हे; तर अध्यात्मशक्तीच्या बळाने! संहाराचा उन्मत ध्वज घेऊन नव्हे, तर शांती आणि प्रीती यांचा, संन्यासवस्त्रांचा अरुण उज्वल रंगाचा ध्वज मिरवत! स्वतः मधल्या देवत्त्वाला आवाहन करा. मग क्षुधा, तृष्णा, शितोष्णादी सुखदुःखे तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत. विलासमय प्रसादात सारी सुखे पायाशी हात जोडून उभी असताना चवीला आपली थोडी धर्मचर्चा करावी, हा हिंदुस्थानचा स्वभाव नाही. हिंदुस्तान धर्माकडे अधिक सखोलपणे गांभीर्याने पाहतो. सदैव त्यागाला सिद्ध राहा, श्रेष्ठता प्राप्त करा, त्यागावाचून श्रेष्ठ कार्ये सिद्धीस जात नाहीत. सर्व सुखविलास उपभोग, कीर्ती, प्रतिष्ठा आणि मानमरातब यांना तिलांजली द्या. स्वतःच्या तन-मन-धन जीवनाचे समर्पण करून असा सेतू बांधा, की ज्यावरून लक्षावधी लोक भवपार जातील.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ६ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २६ जानेवारी २०२६
★ १९५४ क्रांतिकारक, देशभक्त भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्र राॅय यांचा स्मृतीदिन
★ १९५० भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी
★ ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन.
★भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
★ भारत माता की जय…
★ वंदे मातरम….
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
