
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या विद्यार्थ्यांनी बॉक्सिंग खेळ प्रकारात यश संपादन केले. क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला आणि तालुका क्रीडा संकुल,मूर्तिजापुर जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 19 वर्षाखालील मुले व मुलींसाठी शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा दिनांक २०/०१/२०२६ ते २२/०१/२०२६ दरम्यान संपन्न झाल्या. या शालेय क्रीडा स्पर्धेत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या तीन मुलींचा सहभाग होता. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व विभागाचा समावेश होता. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व केले.त्यात कु. कोमल विलास भगत, कु. वैष्णवी सचिन कुलथे या दोन्हीही विद्यार्थिनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक पटकावला तसेच साक्षी प्रमोद सोनवणे या खेळाडूला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यशस्वी विद्यार्थिनींचे मविप्र संचालक,नांदगाव इंजि. अमितभाऊ बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यु. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री राठोड डी.एम. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, विज्ञान विभाग प्रमुख श्री पी.एम. आहेर, आर्ट्स कॉमर्स प्रमुख जी. व्ही. बोरसे, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी बी. के. पवार, ज्येष्ठ शिक्षक बी. वाय. आहेर,ए.जी. पानसरे,एस.जी. पवार, जाधव ए.के. सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी खेळाडू विद्यार्थिनीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनींना खेळाचे कौशल्य तांत्रिक मार्गदर्शन उपप्राचार्य व क्रीडाशिक्षक प्रा. डी. एम. राठोड व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लोकेश गळदगे यांनी केले. क्रीडा विभाग सहाय्यक दिलीप अहिरराव यांनी खेळाडूंच्या स्पर्धा पूर्वतयारीसाठी परिश्रम घेतले.
