
ओझर: (प्रतिनिधी) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार, योगा घेण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, योगगुरु मधुकर नरहरी आवारे, गुरुळे गुरु यांनी बजरंगबली व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन केले. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना योगा व सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले. गुरु आवारे व गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगा यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड मनोरमा सोमवंशी उज्वला जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगा व सूर्यनमस्कार केला. कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका मनोरमा सोमवंशी यांनी केले. आभार क्रीडा शिक्षिका उज्वला जाधव यांनी मानले.

