
सिन्नर (प्रतिनिधी) प्रवासी हे एसटी चे दैवत आहे,प्रवाशांची काळजी व सुरक्षितता राखण्याचे कर्तव्य महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ करते हीअभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि: शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले.ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिन्नर तसेच सिन्नर आगार यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय प्रवासीदिन तसेच रथसप्तमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर सिन्नर आगाराचे वाहतूक नियंत्रक, भरत शेळके,उमेश दराडे,ग्राहक पंचायतचे पदाधिकारी बापू चतुर,प्रभाकर चतुर,प्रा.रामदास सोनवणे,हेमंत टिळे,माजी सैनिक मेजर मदन पुरी आदी उपस्थित होते.यावेळी बापू चतुर,रामदास सोनवणे प्रभाकर चतुर यांनी आपल्या मनोगतातून प्रवाशांनी अवैध प्रवास टाळून सुरक्षित प्रवासासाठी एसटीनेच प्रवास करावा.कारण एसटी ज्येष्ठ नागरिक,महिला,दिव्यांग, दलितमित्र, पत्रकार यांना सवलत देते त्याचा लाभ घेतला जातो.यावेळी प्रवासी म्हणून अशोक पाटील यांनी प्रवाशांच्या समस्या मांडल्या व त्या सोडविण्यासाठी एसटी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमासाठी सचिन धोंगडे,सोपान घोडेकर,योगिता यादव,रुक्मिणी चौरे,अर्चना पांगारकर आदी उपस्थित होते,सूत्रसंचालन बापू चतुर तर आभार सचिन सांगळे यांनी मानले.
