
नाशिक (प्रतिनिधी) नाशिक जिल्हा मराठी भाषा समिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक कवीच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भव्य काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर होते. व्यासपीठावर नाशिक कवीचे कार्याध्यक्ष सुभाष सबनीस, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे हे उपस्थित होते. ते वर्पे पुढे म्हणाले की, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणजे हे कवी संमेलन आहे. जिल्हाधिकारी साहेबांना कविता ऐकायच्या होत्या पण प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजनामुळे त्यांना लवकर जावे लागले. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात हे कवी संमेलन संपन्न झाले. या संमेलनात पंचाहत्तर कवींनी कविता सादर केल्या.कवी नितीन गडवे आपल्या कवितेतून म्हणतात दुर्बलतेची धिंड काढली जाते येथे सहिष्णुताही अशी पाळली जाते येथे तर काशीनाथ महाजन म्हणतात आली दुधाबरोबर ओठातही मराठी जपतो सदैव आम्ही हृदयात ही मराठी मुकुंद गायधनी आपल्या विनोदी शैलीत व्यक्त झाले ते असे…मार्केट मधल्या भाज्या बोलल्या आम्ही निवडणूक लढणार शपथेवर सांगतो आमच्याच राज्य येणार याबरोबरच अशोक पाटील, सुहास वेल्हाणकर, सुहास टिपरे, पुष्पलता गांगुर्डे, संध्या सावकार,छाया सोनवणे, सुधाकर भामरे, राजेश जाधव, दत्तात्रय कोठावदे,वाळू आहेर, सतीश येवला, अपर्णा परदेशी, पार्थ सावळे, मुकुंद गायधनी, काशिनाथ महाजन, राजेंद्र वाघ, सुनील गायकवाड, कविता कासार, महिंद्र बर्वे, नितीन गडवे, प्रकाश अहिरे, याबरोबरच नाशिक कवीचे पदाधिकारी अलका कुलकर्णी, स्मिता बनकर, किरण मेतकर राजेश जाधव हे उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष सबनीस यांनी केले तर भारती देव यांनी सूत्रसंचालन केले.
