लेखक:- ॲड अर्चना धवलचंद्र आढाव

मानवाच्या प्राथमिक गरजा अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आणि आरोग्य. आरोग्य, म्हटलं की शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य असे दोन प्रकार पडतात. शारीरिक आरोग्य म्हंटले तर नागरिकांच्या आरोग्यासाठी शासकीय रुग्णालयात योग्य त्या सोयी सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. आणि खाजगी रुग्णालयात ही शासकीय योजना राबवल्या गेल्या पाहिजे नव्हे तर त्या बंधनकारक केल्या पाहिजेत. जसे, मुख्यमंत्री आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवल्या पाहिजे.... म्हणजे सामान्य नागरिकांना त्याचा लाभ होऊ शकतो. यासाठी नगरपालिकेने खाजगी रुग्णालयांना त्या प्रकारचे बंधन घातले पाहिजे. दुसरे म्हणजे "मानसिक आरोग्य" मानसिक आरोग्य ठीक राहण्यासाठी पुरेशी झोप झाली पाहिजे. ती काही प्रकारच्या भीतीमुळे होत नाही. यामध्ये छोटे दुकानदार ,मोठे व्यापारी, विधवा, एकल महिला यांना चोर ,दरोडेखोर यांची सतत भीती असते. त्यामुळे त्यांना झोप येत नाही यासाठी नगरपालिकेने चौका चौकात सीसी टीव्ही ची यंत्रणा गुप्तपणे राबवली पाहिजे... तसेच गुरख्याची नेमणूक केली तर या विषयाला आळा बसेल.
गुरख्याला फक्त रात्री एक ते चार वाजेपर्यंत तीन तास काम करायचे आहे. त्यासाठी त्याला मासिक वेतन देता येईल. आणि तेही जनतेकडून “सुरक्षितता कर” म्हणून घेता येईल.यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून दहा ते वीस रुपये वार्षिक कर घेतला, तरी गुरख्याचा पगार होऊ शकतो. किंवा शासनाकडून निधी उपलब्ध करून घ्यावा .यामुळे चोर, दरोडेखोर यांच्या हातून होणारे पाप होणार नाही… आणि पोलीस प्रशासन यांनाही मदत होईल. आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निकाली निघेल…….
ॲड अर्चना धवलचंद्र आढाव
