
ओझर: दि. 24 (वार्ताहर )येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते.’सुंदर माझे जाते गं.. या लोकगीताचे सादरीकरण करण्यात आले. ‘दान पावलं दान पावलं गाव जागत आली वासुदेवाची स्वारी… या गायनाने वासुदेवाचे स्टेजवर आगमन झाले. विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी गीत सादर केले.

सदर लोकगीतामधील विद्यार्थी- आदर्श साळुंखे, अनुज धुळवा, यश लोखंडे, आयुष शिंदे,दिव्या काळे, आराध्या वेताळ, अनन्या जाधव संस्कृती पवार, ज्ञानेश्वरी वाघ, ज्ञानेश्वर आंबेकर अंकिता पेखळे अंकिता पेखळे, क्षितिजा माळी इत्यादी विद्यार्थ्यांनी लोकगीतातून ग्रामीण जीवनाचे चित्रण करून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. या लोकगीताला विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती कीर्ती बच्छाव,सौ मंगल सावंत, श्रीमती सरोज खालकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.फलक लेखन शिक्षिका सविता पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली निकम यांनी केले.
मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. या गीताला विद्यालयाच्या शिक्षिका मनीषा पवार व समिती प्रमुख आहेर लता मॅडम व भदाणे मॅडम यांनी प्रत्येकी 501 रुपयाचे बक्षीस जाहीर केले.संगीत शिक्षिका आहेर मॅडम यांनी आभार मानले.
