
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६० वा दिवस
आमच्या जातीचा जो निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि रक्षणकर्ता आहे; ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शिव-शक्ती वा गणेश अशा विविध रूपात आमच्या पूर्वजांनी ज्यांची अर्चना केली; *'एकं सत् विप्राः बहुधा वदन्ति'* या शब्दांत ज्याचे वर्णन केले तो परमेश्वर, त्याच्या विराट प्रेमशक्तीसह आमच्या हृदयात अवतरित होवो. त्याचे शुभाशीर्वाद आम्हांस लाभोत. त्यामुळे आमच्यात परस्परांना समजून घेण्याची शक्ती, परस्परांविषयीच्या खऱ्या जिव्हाळ्याने काम करण्याची शक्ती येवो. परस्परांविषयी प्रेम, मातृत्व बंधुभाव निर्माण होवो. व्यक्तिगत कीर्ती, प्रतिष्ठा, स्वार्थ यांच्या लवलेशाचाही आमच्या मनात मनांना स्पर्श न होवो. अशा विशुद्ध भावाने हिंदुस्थानच्या पुननिर्माणाच्या कार्यात आमचा प्रवेश होवो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ४ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २४ जानेवारी २०२६
★ सुर्य षष्ठी
★ १९६५ इंग्लंडचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांचा स्मृतीदिन
★ १९६६ एअर इंडियाचे ‘कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळून भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यु स्मृतीदिन.
★ २०११ शास्त्रीय गायक, स्वरभास्कर पंडित भिमसेन जोशी यांचा स्मृतीदिन.
★ शारीरिक शिक्षण दिन.
