
मुळडोंगरी ( प्रतिनिधी ) स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक माननीय श्री.एस्.जी्. राठोड साहेब व सचिव श्री.सिद्धांत दादा राठोड तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस्. एस्. यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपशिक्षक श्री कडनोर सर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. यामध्ये “तुम मुझे खून दो,मै तुम्हे आजादी दूंगा” या घोषणेमुळे तरुणांमध्ये स्वातंत्र्यलयाची जाणीव निर्माण झाली.असे आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केले.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी व समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सचिव, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
