
मनमाड ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे आदर्श इंग्लिश मेडिअम स्कूल मनमाड येथे नेताजी सुभाषचंद्र बोस, वसंत पंचमी , संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.प्राचार्या आहेर शितल, विदयार्थी यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.शिक्षिका अहिरे आम्रपाली यांनी विद्यार्थ्यांना थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी यांनी आपल्या भाषणाद्वारे नेताजींच्या देशाप्रती समर्पित जीवनाची जीवन गाथा विद्यार्थ्यांसमोर वाचली. “तुम मुझे खुन दो। मै तुझे आझादी दूंगा त्यांचे हे वाक्य स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायक ठरले.

त्यांच्या विराट अशा राष्ट्रकार्याची महती आपल्या भाषणांतून व्यक्त केली.वसंत पंचमी अवचित्त साधुन विद्यार्थ्यांसाठी संगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने त्यामध्ये सहभाग घेतला. प्राचार्या आहेर यांनी विद्यार्थ्यांना वसंत पंचमी का साजरी केली जात आहे? तसेच संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यी उपस्थित होते.

