
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या स्वर्गीय रोडूआण्णा गोविंदराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयात आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा.महेंद्र रोडूआण्णा पाटील होते. समवेत संस्थेच्या अध्यक्षा कासूताई पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य सद्दामअली अन्सारी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. सुदय बोरसे, प्रा.योगेश ठोके, प्रा. शारिक, एन.एस.एस.प्रमुख निसार, वानखेडे, आर. के. शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. दीपक बोरसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत देवरे यांनी केले, तर आभार प्रा.अमोल अहिरे यांनी मानलेत.
