
जाखोरी.( प्रतिनिधी ) जाखोरी येथे विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील वेदिका शिऊरकर हिने उत्कृष्ट वक्तृत्व सादरीकरण करत “विचारक्रांती युवा वक्ता – २०२६” हा मानाचा प्रथम क्रमांक पटकावला.
सांघिक विचारक्रांती करंडक सायखेडा (नाशिक) येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयाच्या संघाने पटकावला. या संघात अवंतिका डेर्ले, प्रांजल सोनवणे, सानिया सैय्यद व सानिका इंधे यांचा समावेश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन युवा व्याख्याते व सुप्रसिद्ध कवी मा. प्रा. अमोल चिने यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जयम फाउंडेशनचे भारद्वाज सर, रोटरी क्लबचे संजय कलंत्री, जाखोरीच्या सरपंच सौ. अर्पणा नितीन कळमकर व उपसरपंच राहुल धात्रक उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. अमोल चिने म्हणाले की,
“वक्तृत्व ही केवळ शब्दांची कसरत नसून समाजाला योग्य दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. विचारांनी प्रगल्भ आणि मूल्यांनी समृद्ध असे वक्ते घडविण्याचे कार्य विचारक्रांती वाचनालय करत आहे.”
ही स्पर्धा यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत असून राज्याच्या विविध भागांतून एकूण ५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
पारितोषिके पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक – वेदिका शिऊरकर, छ. संभाजीनगर
(₹७,००० रोख + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र)
द्वितीय क्रमांक – सिद्धी गवळी, पिंपळगाव बसवंत
(₹५,००० रोख + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र)
तृतीय क्रमांक – आर्या जाधव, अकोला
(₹३,००० रोख + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र)
चतुर्थ क्रमांक – नाविन्या मिंदे, त्र्यंबकेश्वर
(₹२,००० रोख + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र)
उत्तेजनार्थ पारितोषिके
(प्रत्येकी ₹१,००० + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र)
१) कावेरी कासार – शेवगे दारणा, नाशिक
२) समिक्षा जगताप – ठाणगाव, सिन्नर
३) योगेश वाघचौरे – तळेगाव, चांदवड
४) सानिया सैय्यद – सायखेडा, नाशिक
५) श्रद्धा अहिनवे – पुणे
सांघिक पारितोषिक – विचारक्रांती करंडक
सायखेडा, नाशिक
(विचारक्रांती करंडक + ₹३,००० + प्रमाणपत्र)
समारोपप्रसंगी युवा व्याख्याते किरण सोनार म्हणाले की,
“वक्तृत्व हे समाजातील विचारांचे प्रतिबिंब आहे. अशा स्पर्धांमधून संवेदनशील, जबाबदार आणि विचारशील पिढी घडते. विचारक्रांती वाचनालय आणि जाखोरी ग्रामस्थांनी उभारलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.”
समारोप कार्यक्रमास सिन्नरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, ग्रामाभिमान मंच पळसेचे प्रमोद गायधनी, महाराष्ट्र माझा परिवारचे संस्थापक विकास भागवत यांची उपस्थिती होती.
स्पर्धेचे परीक्षण मा. वैजयंती सिन्नरकर व प्रा. हनुमंत कुरकुटे यांनी केले. सूत्रसंचालन समाधान गायधनी यांनी केले.
कार्यवाहक पंकज खाडे, शिवम आहेर, आदित्य आव्हाड, यश कडवे, स्नेहल सोनवणे व मुस्कान सैय्यद यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देविदास राजपूत, ग्रामपंचायत सदस्य विश्वास कळमकर, कोंडाजी ताजने, रतन कळमकर, पूजा राजपूत, संध्याताई आव्हाड, मनिषा जगळे, तृष्णा बोराडे, संस्कृती सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
