नासाका विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करताना मुख्याध्यापक अरुण पगार, विद्यार्थी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी.
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या हस्ते विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिनी धन्वंतरी गायधनी, वेदिका आडके, मानसी वाघचौरे, श्रुती आडके यांनी भाषणे केली. ज्येष्ठ शिक्षक विजय पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी सूत्रसंचालन करत आभार मानले.