
ओझर:( प्रतिनिधी ) येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मराठी राजभाषा संवर्धन पंधरवडा विद्यालयात विविध उपक्रमानी साजरा केला जात आहे. मराठी भाषा संवर्धन कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्मनाथ बीजच्या निमित्ताने नवनाथ महाराज व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे व ओम चैतन्य शिव गोरक्षनाथ मंदिर ओझर येथील शिष्य हरी विष्णू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे मविप्र सभासद प्रदीप पवार उपस्थित होते. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी मराठी भाषेचे संवर्धन याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या दिनानिमित्त विद्यालयात निबंध वकृत्व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. मराठी विषय शिक्षक रेखा देशमाने मंगल सावंत रूपाली जाधव सरोज खालकर मोरे बी बी महेंद्र डांगळे शितल आहेर कीर्ती बच्छाव जागृती परदेशी शितल शिरोळे व इतर सर्व मराठी विषय शिक्षक उपस्थित होते. तसेच टी इ टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुप्रिया भंडारे व वनिता शिंदे या सेवकांचा मुख्याध्यापक सोपान वाटपाडे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी समिती प्रमुख आहेर एल पी यांनी केले. सूत्रसंचालन इ सातवी विद्यार्थिनी वैष्णवी पाटील हिने केले. रितिका शहाणे तनिष्का जाधव या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाच्या संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’ यासारख्या अनेक कविता सादर केल्या. फलक रेखाटन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. आभार शिक्षक नरेंद्र डेरले यांनी मानले.
