
गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ खेळाडू आणि संघटक आणि मान्यवर.
नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनच्या वतीने दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र क्रीडा दिनाचा निमित्ताने नाशिकच्या विविध खेळातील जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू, आणि संघटक यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारताचे महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारताला ऑलीम्पिकमध्ये पहिले ऑलीम्पिक कास्य पदक मिळवून दिले. त्यांची जयंती १५ जानेवारी रोजी ” महाराष्ट्र क्रीडा दिन ” म्हणून साजरी केली जाते. परंतु दिनांक १५ जानेवारी रोजी महानगर पालिकांची निवडणूक असल्यामुळे हा सन्मान सोहळा काल आयोजित करण्यात आला होता. गोखले शिक्षण संस्थेच्या बी. वाय. के. कॉलेजच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला वंदन करतांना पाहुणे आणि आयोजक
नाशिकचे जेष्ठ क्रीडापटू आणि प्रशिक्षक तथा भोसला सैनिकी संस्थेचे माजी क्रीडा प्रशिक्षक मोहन चेंगेडिया यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल “जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच प्रत्येक खेळातील नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात ज्या ज्या खेळाडू आणि संघटक यांनी सन १९६५ पासून ते आतापर्यंत जे मोलाचे योगदान दिले आहे अश्या १०२ जेष्ठ खेळाडू आणि संघटकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अँथलेटिक्स, दीपक पाटील (मल्लखांब), रोहिणी देशमुख, अशोक निकम (खो-खो), रवींद्र मोरे, प्रा. हेमा मांडे (कुस्ती), विजय खरोटे, श्यामा सारंग (व्हॉलीबॉल), सतीश शिरसाठ, शुभदा आघारकर ( टेबले- टेनिस), अरुण नागपुरे, स्वरांगी सहस्त्रबुद्धे (बास्केटबॉल),स्वाती फडतरे (हॉकी), विलास गांगुर्डे, सुनीता भवर (फुटबॉल), अंबादास तांबे (रोईंग), हेमंत पाटील (चॉक बॉल), कृष्णा नागपुरे (बॉडी बिल्डिंग), प्रमोद रानडे आणि सुलभा आपटे (बॅडमिंटन), उत्तरा खानापुरे (रोप मल्लखांब), भावना गवळी (क्रिकेट), चंद्रकांत भाग्यवंत (हॅण्डबॉल), अजिंक्य दुधारे (बॉल- बॅडमिंटन), ओंकार वैरागकर, कोमल कांबळे (वेट-लिफ्टिंग), शुभदा वैद्य (ज्यूदो), रोहिणी मोगल (तलवारबाजी), श्रीकांत पारेख, कोमल नागरे (लॉन टेनिस), पाठक ( चेस), नंदा महाले (आर्चरी), जगदीश गोल्डे, मधुरा टोपले (सेपक टकरा), उज्वला घुगे (रग्बी), अखिल बुलंगे (स्केटिंग), हर्षल पारोळकर आणि लता भाबड (टेनिस व्हॉलीबॉल), सौ. लहानू जाधव (सायकलिंग), दीपक उपासनी, मेघना काळे (जिम्नॅस्टिकस), दीपक निकम (सायकल पोलो), राशी जहागिरदार (ब्रीज), बुद्धिबळ, मोनाली धोत्रे आणि भूषण भटाटे (कॅरम), विष्णू निकम (शुटटींग-बॉल), राजेंद्र वाघचौरे (मोटो – क्रॉस), अविनाश वाघ (राऊंडर्स) हिमांशू गायकवाड (योगा), मीनाक्षी गिरी (टेनिस क्रिकेट),सायली वायदंडे ( टेनीकॉइट),श्याम काठे, कल्पना निरगुडे (कार्फबोल), सी. डी. सोनावणे, मोहिनी अहिरे (रस्सीखेच), योगेश पिंगळ (मॉडर्न पॅटेथलॉन) या सर्वच खेळांचा समावेश होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केन्द्रीय उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त किशोर बागुल, त्रंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी पुरुषोत्तम कडलग, नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, अशोक कदम यांच्या शुभहस्ते आणि या उपक्रमाचे आयोजक अशोक दुधारे, आनंद खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्व खेळाडू आणि संघटकांना आकर्षक गौरव चिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक अशोक दुधारे यांनी केले, रवीन्द्र मोरे यांनी खाशाबा जाधव यांच्या खेळातील ऑलीम्पिकपर्यंतच्या कामगिरीबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केन्द्रीय उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त किशोर बागुल यांनी या उपक्रमाबद्दल बोलतांना सांगितले की, सन १९६५ पासून तर आत्तापर्यंतच्या खेळाडू, संघटक यांना एकत्र करून त्यांचा सन्मान करणे फार स्तुत्य उपक्रम आहे असे सांगून या खेळाडू-संघटक यांचे विविध खेळामध्ये असलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले. तसेच या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले, त्रंबकेश्वर देवस्थानचे ट्रस्टी पुरुषोत्तम कडलग, चंद्रशेखर सिंग आणि राहुल देशमुख यांनीही उपस्थित पुरस्कारार्थींना संबोधित करून शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन आनंद खरे यांनी केले.

जीवन गौरव पुरस्कार प्राप्त मोहन चेंगेडीया यांना सन्मानित करतांना प्रमुख पाहुणे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक निकम, राजू शिंदे, अविनाश ढोली, कुणाल अहिरे, अविनाश वाघ आणि सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.
