
नांदगाव: (प्रतिनिधी) दिनांक- 18 जानेवारी 2026 मालेगाव येथील ए.टी. टी विद्यालयात जिल्हास्तरीय शुटिंग बॉल स्पर्धा उत्साहात पार पडल्या.या स्पर्धा १७ वर्षाखालील वयोगटात घेण्यात आल्या.१७ वर्ष वयोगटातील मुलांच्या गटात सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात कासलीवाल विद्यालयाने ए.टी.टी हायस्कूल समोर कडवी झुंज दिली.या अंतिम सामन्यात 2 -1ने पराभव झाला असला तरी या स्पर्धेत उपविजेतेपद कासलीवाल विद्यालयाने पटकावले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांनी मार्गदर्शन केले.या स्पर्धेत मालेगाव,धुळे,नाशिक,जळगाव,नंदुरबार येथील दहा संघ सामील झाले होते.

विभागीय शुटिंग बॉल स्पर्धेतील हे उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, यांनी सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ, विशाल सावंत, प्राचार्य मणी चावला यांनी देखील या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
