
नांदगाव(प्रतिनिधी):- आधावड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शालेय समितीचे प्रशासकीय अधिकारी गणेश पाटील, मुख्याध्यापक शाहीद अख्तर, आयाज सर, गोनडे सर, आणि कल्पना शेवरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्ष सौ संगीता सोनवणे यांनी आपल्या भाषणातुन राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तिन्ही महान व्यक्तींच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल मार्गदर्शन केले.

सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान आणि भारतीय स्त्रीवादाची जननी म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित करण्यात आली.राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रभक्तीची जडणघडण आणि संस्कार यावर प्रकाश टाकण्यात आला.स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे युवकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगण्यात आले.कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी सचिव आशाबाई काकळीज,सरला मोढे, सुमित्रा शिंदे,शोभा भोसले,वाबळे ताई,रुबिना शेख,आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थ्यांना पेन व चॉकलेट वाटप करण्यात आले .
