
ओझर: दि.११ वार्ताहर
माधवराव बोरस्ते विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांनी केले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ शिक्षिका रेखा देशमाने मंगल सावंत कीर्ती बच्छाव मनीषा पवार यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी राजमाता यांच्या जिवन कार्यावर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच उप मुख्याध्यापक सतीश केदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रम प्रसंगी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवबा यांच्यावर गायलेल्या ओव्या व पाळणे विद्यालयाच्या संगीत शिक्षिका शितल आहेर यांनी गायल्या. तसेच पतंगीला मांजा न वापरण्याची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी पतंग लावलेले एक सेल्फी पॉईंट बनवण्यात आला. कार्यक्रमाचे फलक लेखन विद्यालयाच्या कला शिक्षिका सविता पवार मोनाली निकम मोहन क्षीरसागर वर्षा पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन सातवी ड च्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या आराध्या वाघ रितिका शहाणे यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंदांची वेशभूषा करून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या वेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका एल पी आहेर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल आहेर यांनी केले व आभार शितल हंडोरे यांनी मानले.
