

सिन्नर (प्रतिनिधी )इंधन बचत केल्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढते व उत्पन्नात वाढ होते.सिन्नर आगाराचा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग अंतर्गत,१६ जानेवारी २०२६ ते १५ फेब्रुवारी २०२६ या इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ.झळके मार्गदर्शन करीत होते.व्यासपीठावर सिन्नर बस आगाराचे प्रमुख हेमंत नेरकर,विभागीय कामगार अधिकारी अश्विनी चव्हाण, आयटीआय चे निदेशक धर्मराज सोनवणे,सचिन तांबे ,वाहतूक निरीक्षक भरत शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आगार प्रमुख हेमंत नेरकर यांनी एसटी चे उत्पन्न वाढविण्यासाठी इंधनबचत करून अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले.विभागीय कामगार अधिकारी अश्विनी चव्हाण यांनी राज्य परिवहन महामंडळाने इंधन वापरकर्त्यांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती दिली.यावेळी एसटी चालक आर. के.आव्हाड,एस.एम. शिंगाडे,एम.एस.सोनवणे,कर्मचारी दिलीप गीते,पांडुरंग आंधळे,योगेश वरंदळ,निलेश जाधव,बाळू एरंडे यांचा उत्कृष्ट काम केल्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यशाळा प्रमुख दिगंबर पुरी,इंधन शाखा प्रमुख सीमा ससाणे,सुनीता सानप,मनोज गोजरे,विशाल पगार,अमीन कादरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी नागरे यांनी केले.आभार विवेक कोकाटे यांनी मानले.
