
नांदगाव :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व महानविचारक स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ” जिजाऊंच्या जीवावर नाही कुणाची पर्वा ” हे गीत काव्यांजली देशमुख व श्रावणी काकड यांनी सादर केले.त्यांना संगीतसाद कल्पना आहिरे यांनी दिली.
विद्यालयातील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा धारण केली – प्रियंका धुमाळ, अंजली पवार, पुष्पांजली पवार, रिद्धी पठारे, गीता जावरे, सोनाली शेवाळे ,समृद्धी सोनवणे वैदवी महिराळ, साक्षी गायकवाड, आराध्या कवडे साक्षी महाजन.
श्रावणी काकड ,रेणुका खाडे, वेदश्री महाजन ,नम्रता सदगीर ,आराध्या शिंदे ,लावण्या देशमुख हर्षदा कर्नर, स्वराली आहेर, श्रावणी आहेर, आरती आहेर, स्वराली आहेर या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
उपशिक्षिका स्मिता केदारे यांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊंनी केवळ एका राजाला जन्म दिला नाही, तर एक स्वराज्य घडविण्याचा विचार या मातीत रुजवला. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द त्यांनी शिवरायांमध्ये निर्माण केली. सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्या स्वतःच न्यायनिवाडा करत असत. माॅंसाहेब जिजाऊ स्त्री शक्तीचे प्रतीक, एक सक्षम मार्गदर्शक होत्या हे सांगितले.
उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारत सरकारने १९८४ पासून १२ जाने. हा ‘ राष्ट्रीय युवा दिन ‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संस्कृती ,अध्यात्म आणि राष्ट्रप्रेम यांचा जगात प्रसार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांनी १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ” शिवभावे जीवसेवा ” हा या संस्थेच्या मुख्य उद्देश होता. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर ‘माणूस घडवणे’ होय. स्वामी विवेकानंद यांनी तरूणांना “जेवढा मोठा संघर्ष असेल, तेवढाच विजय भव्य असेल” असा मोलाचा सल्ला दिला.
उपशिक्षिका सुनिता जाधव यांनी राजमाता जिजाऊंचे आयुष्यात केवळ इतिहास नसून तो येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श आहे. छत्रपती शिवरायांना ज्ञान ,चारित्र्य, चातुर्य संघटन व पराक्रम या सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता!
पर्यवेक्षक अविनाश शेवाळे म्हणाले की,स्वामी विवेकानंद यांनी तरूणांना ” उठा , जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका,”. “जीवनात जोखीम पत्करा , जिंकलात तर नेतृत्व करायला , हारलात तर इतरांना मार्ग दाखवाल”. असे प्रतिपादन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.
