
नांदगाव ( प्रतिनिधी )राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आनंद नगर येथील नगरपालिका शाळा क्र. 2 येथे नगरसेविका एडवोकेट विद्याताई कसबे नेहा ताई कोळगे वंदनाताई पांडे विजयाताई चतुर आशाताई पाटील आधी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मिठाईवाटप केली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून विद्याताई कसबे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करतांनी सांगितले की ज्या वेळेस जिजाऊंचा जन्म झाला होता त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी हत्तीवरून साखर वाटली होती त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त कमीत कमी मिठाई वाटत तरी केली गेली पाहिजे म्हणून माननीय आमदार सुहास अण्णा कांदे व समाजसेविका सौअंजुमताई कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी न पा शाळेचे श्री दीपक मोरे सर -मुख्याध्यापक
श्री प्रकाश बागुल सर
श्रीमती सुजाता जगताप मॅडम आदी उपस्थित होते

