
मोरेवाडी (प्रतिनिधी) बालविवाह मुक्त भारत आपला संकल्प शंभर दिवस अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.याप्रसंगी मुख्याध्यापक गणेश बागुल सर यांनी बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञाचे सामुदायिक अनुवाचन घेतले. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व युवांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मुख्याध्यापक गणेश बागुल सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी मुख्याध्यापक गणेश बागुल सर,उपशिक्षिका योगिता कापुरे मॅडम,अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता राठोड मॅडम,मदतनीस छायाताई सानप,स्वयंपाकी रंजनाबाई मोरे व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता कापुरे मॅडम यांनी केले तर मुख्याध्यापक गणेश बागुल सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
