
नांदगाव ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येथील युवा फाउंडेशन तर्फे एकात्मतेसाठी आणि आरोग्य सदृढ होण्यासाठी रविवारी शेकडो नागरिकांच्या संख्येने नांदगावकर धावले. या स्पर्धेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला असून यात साडेतीनशे हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात समोरील रस्त्यावर घेण्यात आली नांदगावचे नगराध्यक्ष सागर हिरे, छत्रपती क्रिडा पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू विष्णू निकम, आंतरराष्ट्रीय धावपटू मालेगावचे भिकू खैरनार, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या उपस्थितीत हवेत फुगे लावलेला नांदगाव चा फलक सोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

शहरातील क्रीडा क्षेत्रामध्ये आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वतीने अशा क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सागर हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आणि स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तीन व पाच किलोमीटर अशा विभाग स्तरावर स्पर्धक थंडीत ही धावली यात लहान मुलांनी देखील सहभाग नोंदवला

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला रण यशस्वी करण्यासाठी युवा फाउंडेशन चे केतन करावा, अंकुश सुराणा, संदीप पाटील, सुमित सोनवणे, सुमित गायकवाड, प्रसाद वडनेरे, मयूर दाभाडे, सिद्धेश सोनवणे, सुरेश देसले, ओम ठाकूर, निलेश पाटील गोलू बोरसे इत्यादींनी परिश्रम घेतले,
या स्पर्धेतील विजेते असे आहेत.

(गट:- ५किलो मिटर )
प्रथम:- रविंद्र दयाराम चव्हाण, ( प्रिंप्रीहवेली)
द्वितीय:- शशिकांत भगवान गोटे
तृतीय:- कुणाल कैलास जुनधारे
(गट ०३ किमी.)
प्रथम:- तपस्या अशोक अहिरे , मालेगाव
द्वितीय:- कल्याणी निंबा दुरडे,साकोरा
तृतीय:- योगिता भाऊसाहेब हटकर ,पांझनदेव

