
सिन्नर ( प्रतिनिधी ) : चांडकं कन्या विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थिनी स्वरा सोनवणे हिने रामानुजन परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेच्या लेखी टप्प्यात १०० पैकी १०० गुण मिळवत तिने जिल्ह्यात व राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून मुलाखतीसाठी जिल्ह्यातून एकमेव निवड होण्याचा मान तिला मिळाला आहे.

या यशाबद्दल शाळा समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सुनीता कर्डीले तसेच पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.
स्वरा सोनवणे हिला या यशासाठी प्रिया कुलकर्णी व संध्या कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तिच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले असल्याचे मत शाळा प्रशासनाने व्यक्त केले.
या यशामुळे चांडकं कन्या विद्यालय, सिन्नरची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.
