
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजि महाविद्यालय पंचवटी, नाशिक येथील प्रा. नीरज मोकाळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, तसेच एमजीव्ही संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजि , नाशिक या संशोधन केंद्रातून Ph. D पी. एच. डी. पदवी प्राप्त केली. त्यानी “ऍन ऍनालीटीकल स्टडी ऑफ प्रीपेर्डनेस फॉर स्टार कलासिफिकेशन प्रोग्रेशन ऑफ हॉटेल्स इन नासिक डिस्ट्रिक्ट ” या विषयावर आपला सखोल शोधप्रबंध सादर केला. या साठी डॉ. दीपा अभोणकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
प्रा.नीरज मोकाळे हे एमजीव्ही समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजि महाविद्यालयत सहायक प्राध्यपक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विवीध संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आपल्या संशोधनामध्ये हॉटेल्सची पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता व व्यवस्थापनाची तयारी यांचे मूल्यांकन केले असून २०२७ मधे येऊ घातलेल्या कुंभमेळ्यापूर्वी करीता नाशिक मधील होटल उद्योगस गुणवत्तापूर्ण सेवा पुरविण्यासाठी धोरणात्मक आराखडा उपलब्ध करण्यात आला आहे. परिणामी या संशोधनामुळे नाशिकमधील पर्यटन व आदरातिथ्य उद्योगाच्या गुणवत्तावाढीस दिशा मिळण्यास मदत होणार आहे. त्यांच्या या यशात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. स्मिता हिरे, संस्थेचे समन्वयक तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे., महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य डॉ. गणेश तेलतुंबडे.,नॅक कोऑर्डीनेटवर प्रा. डॉ. चेतन बागुल तसेच संस्थेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रा.नीरज मोकाळे यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
