
पिंपळगांव बसवंत(प्रतिनिधी) आज ३ जानेवारी २०२६ रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती लायरे मॅडम यांनी केले.या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे
अध्यक्ष मा.श्री.मंगेश भुजबळ व महिला बचत व निपुण महाराष्ट्र गटाच्या अध्यक्षा सौ.कविता बलदोटा या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे केली.गीत गायन,चारोळी कविता गायन,नृत्य,व विविध वेशभूषा स्पर्धा हे उपक्रम घेण्यात आले. शाळेतील मुलींनी,सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ,मदर तेरेसा,अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर,कस्तुरबा गांधी,इंदिरा गांधी,द्रोपदी मुर्मू,प्रतिभाताई पाटील,
किरण बेदी,सुश्मिता सेन, तसेच मुलांनी महात्मा ज्योतिबा फुले
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,
पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.राजेंद्रप्रसाद,तसेच जय जवान,जय किसान जय विज्ञान या अंतर्गत सैनिक, शेतकरी,वैज्ञानिक, इंजिनिअर,डाॅक्टर अशा विविध वेशभूषा घालून या कार्यक्रमाला शोभा आणली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे मॅडम यांनी मुलांना स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शाळेतील विद्यार्थीनींनी बालिकादिन स्पेशल नृत्य सादर केले.
याप्रसंगी सर्व शिक्षिका भगिनी उपस्थित होत्या. चिमूरड्यांनी सुंदर वेशभूषा करून अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी,पालक, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.या प्रसंगी उपस्थित सर्व ग्रामस्थ

मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद यांनी सर्वांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सौ.कविता बलदोटा यांनी बालिका दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.श्री.संदीप घेगडे यांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप केले.बालअध्यक्ष कु.शिवांश वाकडे याने आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री लायरे मॅडम यांनी केले.
श्रीमती वैशाली पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
