
रोहिले ( प्रतिनिधी ) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित माध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती संस्थेचे अध्यक्ष एस. जी. राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी.
या जयंती कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री एस जाधव मॅडम यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून श्रीयुत पाडवी सर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत बी. एस. सोनवणे सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी प्रतिमा पूजन केले. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. प्रमुख अतिथी पाडवी सर यांनी मनोगत व्यक्त केले . डी एस सोनवणे सर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ जयश्री जाधव मॅडम यांचे भाषण झाले. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीतही त्या कशा लिहायला वाचायला शिकल्या व मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून पहिल्या मुख्याधिकेचा सन्मानही त्यांना मिळाला मात्र या सर्व प्रसंगी समाजाकडून त्यांच्यावरती अनेकदा अन्यायही झाला ही सर्व सावित्रीची कहाणी मुख्याध्यापिका सौ जयश्री जाधव यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. श्रीयुत निकम सर यांनी आभार व्यक्त केले. अशाप्रकारे आनंदमय व प्रेरणादायी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
