
सिन्नर ( प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (रा.प.) सिन्नर आगारात ०१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सुरक्षितता अभियान २०२६चा शुभारंभ आज करण्यात आला. रा.प. बसच्या सुरक्षित व अपघातमुक्त सेवेसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

या कार्यक्रमास महामार्ग पोलीस पथकाचे उपनिरीक्षक मुरलीधर महात्मे, निलेश देशमुख, सेवानिवृत्त नायब तहसीलदार दत्ता वायचळे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे हिरे, सानप, आगार व्यवस्थापक नेरकर, आगार लेखाकार साबळे, वाहतूक निरीक्षक चोपडे, स.वा.नि. पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी,

वेगमर्यादा पाळणे, वाहतूक नियमांचे पालन, प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. रा.प. बसचे अपघात टाळण्यासाठी चालक-वाहकांनी सजग राहणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमात उत्कृष्ट व सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यवेक्षक कर्मचारी, चालक-वाहक तसेच यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवा सांगळे व श्री सचिन सांगळे यांनी केले.
