
साकोरा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र परिवहन महामंडळ आयोजित नांदगाव आगारात ‘सुरक्षितता अभियान’
अंतर्गत गेल्या काही वर्षांत विना अपघात
एकुण १०बसचालकांचा नुकताच सन्मान करण्यात आला.
दिनांक १ जानेवारी ते ३१जानेवारी २०२६ महिनाभर या नवीन वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नांदगाव आगारात ‘सुरक्षितता अभियान’ राबविण्यात येणार आहे.त्यासाठी नांदगाव आगारात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदगाव पोलिस स्टेशनचे पो.नि.दिगंबर भदाणे हे होते

तर आगारप्रमुख हेमंत पगार, प्रा.नारायणे, पत्रकार बाबासाहेब बोरसे व महामंडळाचे चालक, वाहक कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पादचारी रस्त्यावरचा राजा असतो त्याचे संरक्षण करणे वाहकांची जबाबदारी आहे व आगारात विविध प्रकारचे झाडे झुडपे पाहून मला खुप आनंद झाला असल्याचे पो.नि.दिगंबर भदाणे यांनी सांगितले.
नांदगाव आगार हा जिल्हा स्तरावर सुरक्षीत डेपो असल्याचा आनंद असून शाळा, व्यवसाय,नोकरी, बाजारासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगली आहे. एस.टी.महामंडळ चोख सेवा बजावत आहे. त्यामुळे लाखो प्रवासी सुरक्षीत स्थळी पोहचतात . याचे श्रेय वाहक,चालक, व आगार प्रमुख हेमंत पगार यांच्या कामामुळे शक्य होते.नासिक जिल्ह्यातील सलग तीन वर्ष नांदगाव आगार नफ्यात असल्याचे आगार प्रमुख हेमंत पगार यांनी सांगितले.वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष,वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे,मद्यपान करणे या चुकांमुळे अपघात होतात. त्या चुका टाळुन प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवता येईल.प्रवाशांनीही प्रवास करतांना बस सुरु असतांना खिडकीतुन डोके काढु नये. चालकाला गाडी चालविण्यास घाई करु नये. नियम बाह्य थांब्यावर उतरण्याचा आग्रह धरु नये. तसेच प्रत्येकाने वाहतुकीची शिस्त पाळली तर अपघात टाळण्यास मदत होईल. असे प्रा. सुरेश नारायणे यांनी सांगितले. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांत विना अपघात बस चालवणार्या खालील बस चालकांचा सन्मान करण्यात आला.
सुरेश बोडखे, प्रकाश राठोड, तुकाराम बोरसे,जिभाऊ म्हस्के, साहेबराव जोरवर
हेमंत पाटील, शंकर जगधने,अमजद मोमिन,मोईन शेख, मधुकर कांदे.या एकुण, १० चालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळपुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिनगारे यांनी केले
