
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३८ वा दिवस
हिंदुस्तानच्या नसानसांत चैतन्याचा संचार घडविला पाहिजे आणि समाजाच्या सर्वांगात स्फुरण उत्पन्न केले पाहिजे. गुलामांच्या या देशात अज्ञान, दारिद्र्य, घृणा, जातीयता, धर्मांधता, पुराणमतवाद आणि मत्सर ही सर्व भुते आहेत, पण त्यांना गाडून एक संघपणे यशस्वी झाले पाहिजे. ज्यांना जगाचे हित करावयाचे आहे त्यांनी आपली सारी सुखदुःखे, यश, कीर्ती, पत, प्रतिष्ठा हे सारे समुद्रास्मृप्यन्तु केले पाहिजे आणि विनम्रपणे ईश्वरासन्निध आले पाहिजे. सर्व श्रेष्ठ पुरुषांनी हेच सांगितले आहे. शिवाय करून देखील दाखविले आहे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १३ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २ जानेवारी २०२६
★ १७५७ भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीच्या लढाईने पाया रचला.
★ १८८५ लोकमान्य टिळकांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली.
★ १९४४ समाज सुधाकर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी.
★ २०१५ सुप्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांचा स्मृतीदिन.
