
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३५ वा दिवस
हिंदुस्थानात चार माणसे पाच मिनिटे एकत्र काम करू शकत नाहीत. प्रत्येक जण सत्तेसाठी हापापलेला असतो आणि काही काळाने सारी संघटनाच मरगळून पडते. देवा, देवा, देवा! एकमेकांचा मत्सर करण्याचे आम्ही कधी सोडणार! अशा देशात परस्परांपासून कोणत्याही कारणासाठी तुटणार नाही अशी शपथ घेऊन परस्परांवर अमिट प्रेम करणाऱ्या माणसांचा संघ उभा राहिला तर ती अद्भुत आनंददायी गोष्ट नव्हे काय? हा संघ वाढत जाईल उदारमतवाद आणि अथक उमेद यांच्या बळावर तो हिंदुस्थान व्यापेल. तरुणांनी हिंदुस्थानच्या नसानसांत चैतन्याचा संचार घडविला पाहिजे. समाजाच्या सर्वांगात स्फुरण उत्पन्न केले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १० शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल १०/११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५
★ १९०६ हिंदुस्थानच्या फाळणीस जबाबदार असलेल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगची “ढाक्का” येथे स्थापना
★ १९७१ भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचा स्मृतीदिन
★ २०१५ ख्यातनाम मराठी लेखक, कवी, साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचा स्मृतीदिन.
