
रोहिले (प्रतिनिधी) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित माध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक येथे क्रीडा सप्ताह महोत्सवास प्रारंभ. संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत एस. जी. राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालय रोहिले येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजनमाध्यमिक विद्यालय रोहिले बुद्रुक तालुका नांदगाव येथे क्रीडा महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री एस . जाधव मॅडम यांनी प्रतिमा पूजन करून क्रीडा महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा प्रमुख श्री ए बी कटारे श्री एस डी बच्छाव यांनी परिश्रम घेतले तर या क्रीडा सप्ताहाचे श्री पवार पी एस सय्यद एस एन

श्री पी आर निकम, डि के जाधव, जे डी जाधव, पाडवी बी पी यांनी सुंदर नियोजन केले उत्साहाने विद्यालयातील सर्व वर्गातील विद्यार्थी वेगवेगळ्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले.
हा क्रीडा महोत्सव विद्यालयाच्या प्रांगणात पुढील आठवडाभर असाच उत्साह सुरू राहणार असून प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या खेळांची नियोजन करण्यात आलेले आहेत वेळापत्रकाच्या नियोजनाप्रमाणे वेगवेगळे खेळ घेतले जातील

