
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३४ वा दिवस
रोग होण्याची दोन कारणे असतात, एक म्हणजे बाहेरून हल्ला करणारे विषारी जंतू आणि दुसरे म्हणजे शरीराची नाजूक स्थिती. जोवर शरीर रोग जंतूंनी प्रवेश करावा इतके दुबळे झालेले नाही, तोवर जगातील कोणत्याही रोग जंतूंची शरीरात रोग उत्पन्न करण्याची ताकद होत नाही. खरे तर प्रत्येकाच्या शरीरातून असंख्य रोगजंतू सारखे संचार करीत असतात पण शरीर बलवान असते तोवर ते त्यांना दाद देत नाही शरीर दुर्बल होते तेव्हाच जंतू त्यांचा ताबा घेतात आणि रोग उत्पन्न करतात. राष्ट्राचेही असेच आहे राष्ट्राचे शरीर दुर्बल झाले की त्याच्या राजकीय जीवनात सामाजिक आणि शैक्षणिक व्यवस्थांमध्ये सर्व प्रकारचे जंतू घुसतात आणि त्या यंत्रणा दुर्बल करून टाकतात यावर उपाय एवढाच की रोगाच्या मुळाशी गेले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ९ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५
★ १८४४ भारतीय राष्ट्रीय सभा/काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्मदिन
★ १९०० शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक, अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्मदिन
★ १९४२ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्मदिन.
★ १९७१ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचा स्मृतीदिन.
