
नाशिक( प्रतिनिधी):- ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित ‘आनंदाचे ठायी’ (काव्यसंग्रह) आणि ‘नाना तरंग’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन गुरुवार दि.१ जानेवारी रोजी सायं.५.३०वा. मु.शं.औरंगाबादकर सभागृहात होणार आहे.
सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सोहळ्यात रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. ज्येष्ठ विनोदी साहित्यिक नरेश महाजन, ज्येष्ठ विचारवंत प्रा.गंगाधर अहिरे, संवेदनशील साहित्यिक विवेक उगलमुगले, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, प्रकाशक विलास पोतदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी आणि फ्रेंड्स सर्कलचे संस्थापक जयप्रकाश जातेगावकर आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कैलास कमोद यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
प्रकाशनापूर्वी सुप्रसिद्ध गीतकार मिलिंद गांधी, प्रा.डॉ.गणेश मोगल, दत्ता सोनवणे, योगाचार्य अशोक पाटील या निमंत्रितांची काव्यसंध्या रंगणार आहे. कवयित्री डॉ.अंजना भंडारी सूत्रसंचालन करतील.
सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन गिरणा गौरव प्रतिष्ठान, वैशाली प्रकाशन आणि गिरजा महिला मंच, नानासाहेब बोरस्ते मित्रपरिवार यांनी केले आहे.
