
सिन्नर (प्रतिनिधी)आज ‘दलदिन’ म्हणजेच राष्ट्र सेवा दलाचा स्थापनादिन सिन्नर येथील शिवाजी चौकात साजरा करण्यात आला.
साने गुरुजींच्या योगदानाबद्दल महाअंनिसचे नाशिक जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव यांनी माहिती देतांना सांगितले की ‘ सेवा दल हा साने गुरुजींचा प्राण होता. संविधानात आढळणारी शाश्वत मूल्ये म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय यांचीच जपवणूक करणारी मूल्ये साने गुरुजींनी सेवादलात आधीपासूनच रुजविली, असे प्रतिपादन अंनिसचे घोडेराव यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सेवादलाचे सिन्नर शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात सेवादलाच्या उपक्रमांची माहिती दिली.
*अनिल चव्हाण यांनी साने गुरुजींच्या जीवनकार्याला आपल्या मनोगतात उजाळा दिला.
या *कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ताजी वायचळे यांनी साने गुरुजींच्या कार्याची आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीशी सांगड घातली तसेच सेवादलाच्या सैनिकांकडून प्रामाणिकपणाची व कृतीशील राहण्याची अपेक्षा* व्यक्त केली तसेच हुतात्मा शिरिषकुमार यांच्या त्यागाची थोरवी वर्णन केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले तर प्रकाश माळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी दत्तात्रय डोंगरे सर, अशोकराव भाबड, विजय जाधव, संदीप मोरे, गोविंद बाकळे, राजेंद्र दिवे, मनोज माळी, राजेंद्र सातपुते, धनंजय परदेशी, सोमनाथ लोहारकर, गणपत काळे, संजय पोटे, बापू चव्हाण चंद्रकांत झगडे, सुधाकर गुळे, सुरेश परदेशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी साने गुरुजींची ‘खरा तो एकचि धर्म ‘ ही प्रार्थना म्हणण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महामित्र परिवार व महाअंनिसचे अनेक कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.
