
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१३३ वा दिवस
सुख आणि दुःख दोघेही महान शिक्षक आहेत आणि जेवढे ज्ञान त्याला सुखाकडून मिळते, तेवढेच दुःखाकडूनही मिळत असते. ज्ञानमार्ग चांगला आहे; परंतु तो कोरड्या वाद विवादात परावर्तित होण्याची भीती असते. माणसाचे अंतिम ध्येय सुख नसून ज्ञान आहे, कारण सुख आणि आनंदाचा एक ना एक दिवस शेवटच होत असतो. सुख हेच परम ध्येय आहे असे समजणे ही माणसाची मोठी चूक असते जगातील सगळ्या दुःखांचे मूळ हेच आहे की मानवाने अज्ञानामुळे सुख हेच त्याचे अंतिम ध्येय मानले आहे पण काही काळानंतर माणसाला हा बोध होतो की ज्याच्याकडे तो जात आहे ते सुख नसून ज्ञान आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ८ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २८ डिसेंबर २०२५
★ १८८५ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १४१ वा स्थापना दिन ★ १८९९ कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर यांचा जन्मदिन
★ १९२६ हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्मदिन
★ १९३७ टाटा उद्योग समूहाचे प्रमुख, उद्योगपती रतन टाटा यांचा जन्मदिन.
